गुर्जरांची खान्देशी संस्कृती आणि नदीचा काठ

गुर्जरांची खान्देशी संस्कृती आणि नदीचा काठ



गुर्जर बांधवांची खान्देशी संस्कृती संपूर्ण राज्याला सुपरिचित आहे. या समाजाच्या चालीरिती, रूढी, परंपरा कित्येक वर्षांनंतरही कायम आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली, मात्र चांगल्या चालीरिती व परंपरांचा समाजाला कधी विसर पडला नाही. आजही त्या सुरूच आहेत. जुन्या व नव्याचा अनोखा संगम करीत समाज प्रगती करीत आहे.
गुर्जर समाजाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. नदी काठावरील गावांमध्ये बहुसंख्य समाज वास्तव्य करीत आहे. काळी कसदार, गाळाची जमीन. सोबत पर्शिमाची जोड. त्यामुळे हा समाज प्रगती करीत आहे.
एकत्र कुटुंब पद्धती हे सुद्धा गुर्जर समाजाचे एक वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारण कुटुंबकर्ता घरात तीन ते चार पिढी सक्षम होईपर्यंत एकत्र आनंद घेत असत. आजही अनेक गावांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती कायम आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंब एकमेकांपासून दूर गेली असली तरी ती सुटीच्या काळात एकत्र येतात. गुण्यागोविंदाने राहतात.
 
सर्व परिवार मोठय़ा घरी एकत्र येऊन वडिलांचा मोठा पित्तर, मोठा रस, पोळा, दसरा, होळी, देवांचे, हरतालिका, कानबाई, गुढीपाडवा, दिवाळी, अक्षयतृतीया हे सत्र एकत्र येऊन साजरे करीत असत. आताही काही कुटुंब अशा पद्धतीने सणांचा मनमुराद आनंद लुटतात.
 
पूर्वी वयाच्या १0-१५ वर्षातच लग्ने आटोपत असत. शिक्षणाकडे न जाता घर, कुटुंब व शेती सांभाळण्याचे सूत्र दिले जात होते. त्यामुळे महिला विविध क्षेत्रात पारंगत होत असत. भिंतीवर रेषा ओढणार्‍या स्त्रिया आजच्या सुशिक्षित महिलांपेक्षा कित्येक पटीने शहाण्या असत.
 
समाजाचा विवाह सोहळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतो. भाऊबंदकीत हळदीची थाप, प्रत्येक घरी तोरण, आमंत्रण प्रत्येकाकडे व लग्न सात दिवस चालत असते. शेतीचे उद्योग आटोपून मार्चपासून विवाह ठरत. समाजाच्या किंवा नातेवाइकांच्या येण्या-जाण्याचे अगर भेटीचे प्रसंग फार कमी घडत असत, त्याला मुख्य योग म्हणून लांब पद्धतीचा विवाह काढून मौज केली जात असे. अगदी साधे जेवण, वरण पोळी, शिरा किंवा वरणासोबत साखर, गूळ वापरला जात असे. आता मात्र या लग्न पद्धतीत काहीसा बदल झाला आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे जो-तो विवाह सोहळा धूमधडाक्यात साजरा करीत असतो. साखरपुडा, मूळ लावणे, बाल संगोपन स्त्री संस्कृती, र्मयादा पालन, द्रव्य रक्षण, पुनर्विवाह, जात पंचायत आदी गुर्जर समाजात वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळेच या समाजाची सर्वत्र आगळीवेगळी ओळख आहे

संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील
अध्यक्ष:-गुर्जर सम्राट युवा मंच,महाराष्ट्र 
प्रदेश सचिव :-अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, महाराष्ट्र 
मो. 9049360411


Comments

Popular posts from this blog

खान्देशातील गुर्जर पोटजाती

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar