गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

गुर्जर आहात तर
आडनाव गुर्जरच हवे

कुणबीसुद्धा गुर्जर होते


लेवा, दोडे, सूर्यवंशी, बडगुर्जर या गुर्जरांच्या चार पोटजाती आहेत. याव्यतिरिक्त कुणबीसुद्धा गुर्जरांची एक पोटजात असल्याची इतिहासात नोंद आढळते. स्थलांतर होऊन कुणबी हे गुजरात राज्यात आले, त्यानंतर तेथून ते महाराष्ट्रात आले असल्याची माहिती परिषदेचे संयोजक डॉ.जयसिंग गुर्जर यांनी आपल्या गुर्जर समाजाची उत्पत्ती या शोधनिबंधाद्वारे दिली.
गुर्जर म्हणजे शत्रूचा पराभव करणारा
सीकर येथील प्रा.सैतानसिंग गुर्जर यांनी गुर्जर साहित्य हा शोधनिबंध सादर केला. त्यात त्यांनी गुर्जर शब्दाचा संस्कृतमधील प्रसिद्ध शब्दकोषाचा संदर्भ देत अर्थ स्पष्ट केला. गुर्जर म्हणजे शत्रूचा पराभव, विनाश करणारा असा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक पुस्तकांचेही त्यांनी संदर्भ दिले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात व बाडरेलीच्या सत्याग्रहातील गुर्जरांचे योगदान याबाबतही सविस्तर विवेचन त्यांनी केले.
गुर्जर दानशूर कर्णाचे वंशज
गुर्जर विदेशी आहेत ना वैश्य. ते महाभारतातील वीर योद्धा दानशूर कर्णाचे वंशज होते. प्राचीन कालीन भरूच येथील जयभट्ट तृतीय यांच्या दानपत्रात हा उल्लेख आढळून येत असल्याची माहिती डॉ.नरसिंह परदेशी यांनी आपल्या शोधनिबंधाद्वारे दिली. गुर्जरांचा इतिहास गौरवशाली आहे. प्राचीन काळात त्यांनी आपली शूरता दाखवून दिली आहे. गुर्जर, बडगुर्जर व राजपूत यांच्यातील संबंधाबाबत त्यांनी माहिती दिली.
 
कुशानांचे योगदान मोलाचे
प्राचीन इतिहासात कुशाणांचे योगदान हे मोलाचे होते, हे डॉ.जुगल किशोर दुबे यांनी आपल्या शोधनिबंधाद्वारे पटवून दिले. या वेळी त्यांनी या वंशाची तसेच त्यांच्या काळातील नाण्यांची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या दुर्मीळ माहितीबद्दल सत्राध्यक्ष व इतर मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
 
राजा मिहीर भोज यांच्यासारखा राजा होणे नाही
राजा मिहीर भोज यांच्यासारखा राजा होणे नाही, अशा शब्दात रोहतक येथील मनुदेव शास्त्री यांनी त्यांची महती व्यक्त केली. त्यांची शासन व्यवस्था, इतर राज्यकर्त्यांशी त्यांचे असलेले संबंध, त्यांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण नाणी आदींमुळे ते सुपरिचित होते. त्यांची तुलना रोम सम्राटांशी केली जात होती.
 
सरदार वल्लभभाई पटेल गुर्जरांची शान
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे गुर्जरांची शान होते, हे अँड.बी.बी. पाटील यांनी त्यांच्या शोधनिबंधाद्वारे पटवून दिले. समाजाच्या प्रगतीसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यात बालविवाहबंदी, महिलांना स्वातंत्र्य, जन्म, मृत्यू व लग्नावरील अवास्तव खर्च, अहंकाराचा त्याग आदीबाबत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. प्राध्यापक गणिताचे; संशोधक इतिहासाचे
परिषदेचे संयोजक डॉ.जयसिंग गुर्जर हे गणिताचे प्राध्यापक आहेत. मात्र इतिहासाची आवड असल्याने ते या विषयाचे संशोधक बनले आहेत. १४0 शोधनिबंध देश-विदेशातील परिषदांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. एवढेच नव्हे तर इतिहासाची त्यांची एकूण १२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १२ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे. या अनोख्या व्यक्तिमत्त्वाची परिषदेत चर्चा होती.
 
महाराष्ट्रातील पुस्तकांमध्ये गुर्जरांचा इतिहास नाही

संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील
अध्यक्ष:-गुर्जर सम्राट युवा मंच,महाराष्ट्र 
प्रदेश सचिव :-अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, महाराष्ट्र 
मो. 904936041


Comments

Popular posts from this blog

खान्देशातील गुर्जर पोटजाती

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar