बळीराजाला कमी लेखू नका

बळीराजाला कमी लेखू नका
.. तर संपते नोकरीवाल्याच्या घरी 'डाळ'
दोडे गुर्जर समाजाच्या युवक-युवती परिचय मेळाव्यात एकमुखी मागणी



भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा मोलाचा वाटा असताना शेतकर्‍यांना कमी लेखले जाते. शेती व्यवसायाशी गुर्जर समाजाची नाळ जुळलेली असल्याने पूर्वजांपासून हा व्यवसाय केला जात आहे. मात्र, समाजात विवाह जुळवताना मुलगी व तिच्या पालकांकडून शेती करणार्‍या मुलाला नेहमी नाकारले जाते, यापेक्षा वाईट काय असू शकते. बळीराजाला कमी न लेखता त्याला प्राधान्य द्यावे, अशी एकमुखी मागणी दोडे गुर्जर समाजाच्या वधू-वर मेळाव्यात मान्यवरांनी केल
संसार करताना एकमेकांच्या अपेक्षा समजून घेणारी, साक्षर, चांगल्या स्वभावाची वधू असावी, अशी अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. तर मुलींनी सुंदर, सुस्थापित मुलाची अपेक्षा परिचय देताना व्यक्त केली. दोन एकर शेती असलेला मुलगा चांगला संसार करू शकतो. नोकरीनिमित्त नेहमी फिरावे लागते. शेतकर्‍याचे तसे नाही. नोकरीवाला सलग दोन दिवस चांगले जेवण देऊ शकत नाही, ते फक्त शेतकर्‍याच्या घरी मिळेल, असा चिमटा इंदिरा पाटील यांनी काढला. नोकरीवाल्याच्या घरी १0 पाहुणे गेले तर त्याच्या घरची डाळ संपते. शेतकर्‍याच्या घरात ५0 किलो डाळ सापडली नाही तर बोला, असेही त्या म्हणाल्या. .. तर संपते नोकरीवाल्याच्या घरी 'डाळ' नोकरीवाल्याने 'एकर'भर जमीन खरेदी करून दाखवावी
 
समाजाने शेतीच्या माध्यमातून प्रगती केली आहे. समाज बांधवांनी मुलीच्या लग्नासाठी नोकरीवाल्या मुलाचा हट्ट करू नये. एका शेतकर्‍याकडे दोन एकर जमीन असली तरी तो कोट्यधीश आहे. नोकरीवाल्याने त्याचा पगार, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, गुंतवणुकीची रक्कम मिळून 'एकर'भर जमीन खरेदी करून दाखवावी, असे आव्हान के.डी. पाटील यांनी दिले. शेतकरी मुलगा चालेल पण..
शेतकरी मुलाशी लग्न कराल का? असा प्रश्न मेळाव्याला आलेल्या काही मुलींना विचारला असता, लग्नासाठी मुलगा घरचेच पाहतात. ते नोकरीला प्राधान्य देतात. शेतकरी मुलगा चालेल, पण त्याच्याकडे पुरेशी शेती असावी, त्याला शेतीचे ज्ञान असावे, शेतीत कामाचे बंधन नसावे, मुलीची नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्याला विरोध नसावा असे सांगितले.
मानसिकता बदला
मी शहरात वाढलो आहे, म्हणून खेड्यातील मुलगा किंवा मुलगी करणार नाही ही भूमिका मुलगा किंवा मुलीने घेऊ नये. आपली मानसिकता बदलण्याची आज गरज आहे. मुला-मुलीतील स्वभावगुण, कुटुंबाची वागणूक याबाबींवर भर द्या, असा सूर व्यक्त झाला.
हे 'गुण' आले कोठून?
'गुण' जुळले नाहीत म्हणून सोयरिक मोडते. हे गुण आले कोठून? असा प्रश्न गोरखतात्या पाटील यांनी उपस्थित केला. मुला-मुलींच्या लग्नासाठी महिला वर्ग 'गुण'या संकल्पनेला जास्त महत्त्व देतो. ही केवळ अंधर्शद्धा असून नशिबात जे असेल तेच घडते असे ते म्हणाले.

संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील
अध्यक्ष:-गुर्जर सम्राट युवा मंच,महाराष्ट्र 
प्रदेश सचिव :-अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, महाराष्ट्र 
मो. 9049360411


Comments

Popular posts from this blog

खान्देशातील गुर्जर पोटजाती

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar