देशात १६ कोटी गुर्जरि

देशात १६ कोटी गुर्जरि


देशात १६ कोटी गुर्जर आहेत. यातील अधिकांश गुर्जर बांधव पशुपालक असल्याची माहिती शेवटच्या चर्चासत्रामध्ये अभ्यासकांनी दिली. 
 गुर्जरांचा राजकारणातील सहभाग कमी -
गुर्जर समाज हा पशुपालक आहे. जगात पशुपालन करून उपजीविका चालविणार्‍या कुटुंबांमध्ये हजारो कुटुंबे गुर्जरांची आहेत, असे पुणे येथील अभ्यासक किशोर लासुणे म्हणाले. यात छत्रपती शिवाजी महाराज हे शिसोदिया वंशाचे व त्यानंतर गवळी धनगर असल्याचे वाचनात आले होते. परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज हेदेखील गुर्जर होते. शिवाय त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.
 
प्रतापराव गुर्जरांचे कार्य महान -
छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मदत करून झुंज देणारे प्रतापराव गुर्जर हे पराक्रमी होते. चुकीची गुप्त माहिती मिळाल्याने ईर्षेने ते बेहलोलखानावर तुटून पडले. परंतु त्यांना वीरमरण आले. असा योद्धा होणार नाही,
 
तोरणमाळात आले गुर्जर
-
राजस्थानमार्गे गुर्जर खान्देशात आले. खान्देशात ते सर्वप्रथम तोरणमाळ येथे आले. तेथून गट करून ते पशुधनाच्या पाण्याच्या गरजेमुळे नदी काठांवर स्थिरावले. गोमाई, तापी आदी नदी काठांवर गुर्जर आहेत,
इसवी सन ३00 ते ५00 पर्यंत गुर्जर साम्राज्य -
इसवी सन ३00 ते ५00 या कालावधीत मध्य आशियात ठिकठिकाणी गुर्जर साम्राज्य होते, असे जयपूर येथील के.आर. गुर्जर म्हणाले. चंद्रगुप्त मौर्याच्या सैन्याशीही गुर्जर राजांचे युद्ध झाले होते. कुषाणांनंतर गुर्जर राजांचे साम्राज्य स्थापन झाल्याचे ते म्हणाले.
 
विदेशी लेखकांनी इतिहास बिघडविला -डॉ.जयसिंग गुर्जर
विदेशी लेखकांनी गुर्जरांना विदेशी म्हटले आहे. या विदेशी लेखकांनी गुर्जरांचा इतिहास बिघडविण्याचे काम केल्याचा आरोप कुरुक्षेत्र येथील डॉ.जयसिंह गुर्जर यांनी केला. कुशाण, श्‍वेत हुण आणि गुर्जर यांच्यासंबंधी वाद निर्माण करण्याचे काम विदेशी लेखकांनी केले. गुर्जर हे दशरथ पुत्र लक्ष्मण याचे वंशज असून, सूर्यवंशी आहेत.
 
वास्तव एकच, ते स्वीकारावे
संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील
अध्यक्ष:-गुर्जर सम्राट युवा मंच,महाराष्ट्र 
प्रदेश सचिव :-अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, महाराष्ट्र 
मो. 9049360411
GURJAR SAMARAAT YUVA MANCH
PRESIDENT:-SANDEEP GURJAR PATIL….9049360411


Comments

Popular posts from this blog

खान्देशातील गुर्जर पोटजाती

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar