लेवा गुर्जर हे सरदार पटेलांचे वारस

लेवा गुर्जर हे सरदार पटेलांचे वारस

पश्‍चिम खान्देशामधील लेवा गुर्जर हे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे वारस असल्याचे मत संशोधकांनी दुसर्‍या चर्चासत्रामध्ये व्यक्त केले. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.मधुकर पाटील हे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. तर डॉ.शांताराम बडगुजर हे समन्वयक होते.
 

प्रकाशा गुर्जरांनी वसविले
शहादा तालुक्यातील प्रकाशे हे प्राचीन गाव गुजरातमधून स्थलांतरित होऊन आलेल्या गुर्जरांनी वसविले आहे. त्यासंबंधी अनेक दाखले इतिहासात अभ्यासता येतात, असे इतिहास संशोधक रंजना पाटील यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल हे गुर्जर समुदायातील थोर नेते पश्‍चिम खान्देश म्हणजे शहादा, प्रकाशा, नंदुरबार आदी भागातील लेवा गुर्जरांचे पूर्वज असल्याचे त्या म्हणाल्या. पश्‍चिम खान्देशातील लेवा गुर्जरांची भाषा गुजराथी आहे. ते राहत असलेल्या भागामध्ये आदिवासी, अहिराणी व मराठी या भाषाही बोलल्या जातात. शहादा तालुक्याच्या मध्य प्रदेशलगतच्या सिमांत भागात खेड, खेतिया, रायखेड आदी भागातील लेवा गुर्जर नेमाडी बोलीभाषा बोलतात, असेही त्यांनी सांगितले.
 
- रंजना पाटील
अनेक सत्य बाबी दुर्लक्षित
गुर्जर इतिहासासंबंधी अनेक सत्य बाबी या दुर्लक्षित आहेत. त्या समोर आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अमरसिंह कसाना यांनी केले. भगवान देवनारायण यांच्यासंबंधी त्यांनी संशोधन सादर केले. जगामध्ये एकात्मता जोपासण्यासाठी गुर्जरांनी योगदान दिल्याचे दाखले त्यांनी दिले.
 
- अमरसिंह कसाना

गुर्जर समुदायामुळे गुजरात नामकरण
८00 वर्षांपूर्वी गुजरात नावाचा उल्लेख आढळत नाही. राजस्थाननजीकचा या प्रदेशात गुर्जरांची वस्ती होती. राजस्थानातून अनेक गुर्जर या भागात आले. गुर्जर समुदायामुळे गुजरात हे नाव पडले, असा दावा सौराष्ट्र येथील कल्पा माने यांनी केला. सौराष्ट्रामध्ये गुर्जरांची संख्या अधिक आहे. सरदार वल्लभभाई पटेल या गुर्जर नेत्याने देशाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतानाच सौराष्ट्रमध्ये काठियावाड परिषदेच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात एकोपा जोपासण्याचा विडा उचलला होता. त्यांनी खलिस्तान चळवळीपासून अनेक मुद्यांवर काठियावाड परिषदेचा ऊहापोह झाला. मोरबीमध्ये झालेल्या पाचव्या काठियावाड परिषदेचे अध्यक्षपद सरदार पटेलांनी भूषविले होते. धनाढय़ांची मक्तेदारी मोडण्यासंबंधी सरदार पटेलांनी या परिषदेच्या माध्यमातून जागृती केली, असेही त्यांनी सांगितले.
 

संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील
अध्यक्ष:-गुर्जर सम्राट युवा मंच,महाराष्ट्र 
प्रदेश सचिव :-अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, महाराष्ट्र 
मो. 9049360411


Comments

Popular posts from this blog

खान्देशातील गुर्जर पोटजाती

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar