खान्देशातील गुर्जर पोटजाती

खान्देशातील गुर्जर पोटजाती               

v  जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गुर्जर अधिक आहेत. गुर्जरांची वंशावळी ठेवणार्‍या भाटांच्या नोंदीनुसार गुजरांची उत्पत्ती र्मयात ऋषीपासून झालेली आहे. हे लोक भारतातून वा गुजरातेतून आले असावेत अशी नोंद धुळे जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये आढळते. 
खान्देशात गुर्जरांच्या सात पोटजाती आहेत.
 
v  लेवा गुर्जर - लेवापुराण नामक ग्रंथानुसार लेवा गुर्जर सोमवंशीय असल्याचा अनुमान काढला जातो. त्यांचे मूळ गोत्र कश्यप असून सोमवंशीय राजा बळी याचा पूत्र लेहक यापासून लेवा आणि बळीचा भाऊ भद्र याचा पूत्र कैटभयापासून कडवा या शाखा उत्पन्न झाल्या. मथुरेच्या पश्‍चिमेस लेहकपूर नामक गाव असून तेथे लेवा वंशाची वसाहत होती. लेवा शाखेतून लेवा गुर्जर व लेवा पाटीदार आणि कडवा शाखेतून कडवा गुजर व कडवा पाटीदार उपशाखा निर्माण झाल्या असाव्यात. खान्देशातील लेवा गुर्जर मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील ऐनपूर, खिर्डी, निंभोरे, चांगदेव, वाघोद, तांदलवाडी, केर्‍हाळे, अंतुर्ली इ. गावांमध्ये बहुसंख्येने आढळतात. तसेच शहादा तालुक्यातही हे लोक राहतात. लेवा गुर्जरांची अंबिक, अत्री, भारद्वाज, गौतम, कश्यप, वसिष्ठ, अशी अकरा गोत्रे व ३६0 कुळ आहेत. 

v  दोरे (दोडे) गुर्जर - दोरे किंवा दोडे गुर्जरांची संख्या चोपडा, यावल, धरणगाव, अमळनेर, एरंडोल व जळगाव तालुक्यात अधिक आहे. शिरपूर, शहादा शिंदखेडा, तालुक्यातही दोडे गुर्जर आहेत. 
यांच्या पूर्वजांनी दोरमाता देवीस द्रोणाचा मंडप वाहिल्याने त्यांना हे नाव प्राप्त झाले. दोरे हा अपभ्रंश होऊन पुढे याचेच नाव दोडे असे झाले असावे. त्यांची पवार, चौहान, चौथन, गोहील, चावडा, दोडीये, गुजारी, दोडे, खापरे, बारोद, जाधव, भटेले, सूर्यवंशी, सिमल, गेलोत, काबा, खवी, निकुंभ, टोका, झाला, वाघेला, हुना, सुखते, पाढीकर, निंबाले, देवारे, भागेसा, कागवा, वनहोल, तोवार, खिची, दाभी, माकवणे, गौड, हरीहर, जावखेडे, साखेळे, बोश्री, निबोराड अशी ४१ कुळे आढळतात.
 
दोडे गुर्जर उत्तेरकडील दर्बगड (राजस्थान) येथून अबू येथे आलेत. तेथून भडोच जिल्ह्यातील अंकलेश्‍वरला व तेथून मंडागड आणि बडोद्याच्या दाथोई किल्ल्यात आले. तेथून पावागडकडे आले. १४८४ मध्ये मुसलमानांनी पावागड घेतल्यावर ते तोरणमाळ डोंगर रांगेत आले.
 
तोरणमाळहून सहा गट पाडून एक सुलतानपूर, दुसरा कोठडी, तिसरा धानूर, चौथा शिरपूर, पाचवा शहादा, सहावा मुस्तफाबाद (चोपडा) येथे आला. चोपड्याला प्रथम जोमालसिंग नामक दोरे गुर्जर आला होता. त्याच्या पाचव्या पिढीतील वंशज जिवाजी हा त्र्यंबकजींचा मुलगा होता. या जिवाजीस शहाजहान बादशहाच्या कारकिर्दीत चोपड्याचा देशमुख म्हणून नेमणूक मिळाली. हे देशमुख दोर मातेचे भक्त असून कश्यपगोत्री, पवार कुळातील आहेत. दोडे गुजरांचे पंचायत प्रमुखपद या देशमुखांकडे परंपरागत चालत आलेले आहे. ते राजस्थानातील परमार कुळातील असल्याचे सांगतात.
 

v  डाले गुर्जर - तूर पिकवून डाळ करणार्‍या गुर्जरांना डाले किंवा ढाले गुर्जर नाव पडले. ते रावेर, बर्‍हाणपूर भागात आहेत. 
v  कड्या गुर्जर - कट्टर या अर्थी कडवा हे नाव प्राप्त झाले असून, रावेर तालुक्याच्या मध्य प्रदेशाकडील सीमेलगत पाडळे, भातखेडे, चोरवड, मोरगाव, खानापूर येथे कड्या गुजर आढळतात. 
गरी गुर्जर - हे गुर्जर अल्पसंख्य असून जामनेर तालुक्यात आढळतात. त्यांना गहिरी असेही म्हणतात. जामनेर तालुक्यातील गरी गुर्जरांमधील देशमुख स्वत:ला लेवा गुर्जर म्हणवून घेतात.
v  बडगुजर - लोंडारी किवा बडगुजर हे यावल व चोपडा तालुक्यांमध्ये आढळतात. त्यांना बडगुजर असेही म्हणतात. बाड किंवा लोंडारी हे कापूस पिंजण्याचे काम करीत असल्याने हे नाव पडले असावे. 

v  खापरा गुर्जर - गुर्जरांमधील मिर्श विवाहापासून निर्माण झालेली ही पोटशाखा असून, इतर गुर्जर खापरा गुर्जरांना कनिष्ठ मानतात.
संदीप ज्ञानेश्वर गुर्जर पाटील
अध्यक्ष:-गुर्जर सम्राट युवा मंच,महाराष्ट्र 
प्रदेश सचिव :-अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा, महाराष्ट्र 
मो. 9049360411

Comments

  1. नमस्कार साहेब
    श्री प्रविण मधुकर पाटील (विटनेरकर)
    साहेब आपण खूप छान बनवले आहे... 🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गुर्जर आहात तर आडनाव गुर्जरच हवे

प्रतापराव गुजर – Prataprao Gujar